सोलापूर आणि लातूर जिल्ह्यासाठी प्रकल्प अधिकारी म्हणून सौ .रेखा सोनकवडे यांची निवड . नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण. रेखा सोनकवडे यांची ग्रामीण विकास मिशनच्या सोलापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती. व्हीएस पँथर्सच्या ७ व्या सामूहिक विवाह सोहळ्याची लातुरात जय्यत तयारी : विनोद खटके चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन. जिल्हा परिषद खैराट या शाळेत महाराष्ट्र दिन व शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न…..

हर खबर सबसे पहले

महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेस चे सरचिटणीस माननीय श्रीरंग बरगे यांचे लातूरमध्ये सभेचे आयोजन…

मा. अभयदादा साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती.

लेखक, अभ्यासू नेतृत्व,सार्वजनिक वाहतूक या विषयातील तज्ञ, प्रसिद्ध निवेदक, बिनधास्त, बेधडक, अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे लाडके कामगार नेते माननीय श्रीरंग बरगे हे सोमवार दिनांक 23 मार्च 2026 रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता राज्य परिवहन विभागीय कार्यालय, लातूर येथे उपस्थित राहणार असून बीड, धाराशिव, व नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती, व त्यांना मुंबईत भेटण्याची वेळही देण्यात आली होती, परंतु साहेबांना अचानकपणे लातूरला यावे लागत असल्याने सर्वांनी लातूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विभागीय सचिव महेश बिराजदार, महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस लातूर, व जिल्हा कार्यकारिणी लातूर विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे. यासोबत कोणत्या कर्मचाऱ्यांची काही अडचण असल्यास, प्रशासनाबाबत तक्रारी असल्यास सकाळी 10:00 वाजता लातूर जिल्हा कार्यकारिणी सोबत संपर्क करण्याचे आवाहन लातूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, अनिल कोकणे, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस यांच्या वतीने करण्यात आले आहे….

Leave a Comment

और पढ़ें

चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन.