सोलापूर आणि लातूर जिल्ह्यासाठी प्रकल्प अधिकारी म्हणून सौ .रेखा सोनकवडे यांची निवड . नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण. रेखा सोनकवडे यांची ग्रामीण विकास मिशनच्या सोलापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती. व्हीएस पँथर्सच्या ७ व्या सामूहिक विवाह सोहळ्याची लातुरात जय्यत तयारी : विनोद खटके चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन. जिल्हा परिषद खैराट या शाळेत महाराष्ट्र दिन व शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न…..

हर खबर सबसे पहले

व्हीएस पँथर्सच्या ७ व्या सामूहिक विवाह सोहळ्याची लातुरात जय्यत तयारी : विनोद खटके

लातूर : प्रतिनिधी : व्हीएस पँथर्स युवा संघटन महाराष्ट्र राज्यच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून लातुरात येत्या दि. १० मे  २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सातव्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाल्याची माहिती व्हीएस पँथर्सचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने प्रेरित होऊन मागच्या सलग सात वर्षांपासून अशा प्रकारच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. आतापर्यंत २०० ते २२५ सर्वधर्मीय सामूहिक विवाह करून देण्यात आले आहेत.यावर्षीच्या विवाह सोहळ्यात एकूण ३५ वधू  – वरांचे  विवाह लावून दिले जाणार आहेत. यामध्ये मुल्सिम दोन, बौद्ध १८ तर हिंदू समाजातील १५ वधू  – वरांचा समावेश आहे. वधू – वरांना  मणी मंगळसूत्र, विवाहाच्या चा पेहरावांसह संसारोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात येणार असल्याचे विनोद खटके यांनी सांगितले.
हा विवाह सोहळा लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या भव्य मैदानावर रविवारी  सायंकाळी आठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खा. डॉ. शिवाजीराव काळगे, यांच्यासह  माजी मंत्री आ. संभाजी पाटील  निलंगेकर,  आ.अभिमन्यू  पवार,  माजी मंत्री आ. संजय बनसोडे,  माजी मंत्री  आ. अमित देशमुख, आ. रमेशआप्पा कराड,  शिक्षक आमदार विक्रमबप्पा काळे, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा  व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड  आदी मान्यवरांनाही   निमंत्रित करण्यात आले आहे. या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यास हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी  मंडळी उपस्थित राहणार असून त्या सर्वांच्या सुरुची भोजनाची सोय  करण्यात आली आहे . या सोहळ्यासाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था जुन्या रेल्वे लाईनलगतच्या  विलासराव देशमुख रस्त्याच्या बाजूने करण्यात आली आहे. वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी आमच्या स्वयंसेवकांकडून घेतली जाणार असल्याचे खटके यांनी सांगितले. प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यास लातूरकरांनी उपस्थित राहून वधू  – वरांना  शुभाशीर्वाद द्यावेत,असे आवाहनही विनोद खटके यांनी केले आहे. याप्रसंगी व्हीएस पँथर्सचे प्रदेशाध्यक्ष सचिन मस्के यांच्यासह  संपर्क प्रमुख आनंद जाधव,मराठवाडा अध्यक्ष निलेश कांबळे, रवि कुरील, विद्यार्थी आघाडी मराठवाडा अध्यक्ष प्रितम  दंडे , कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष किरण पायाळ  शहराध्यक्षअसद शेख,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्नील कांबळे, यांसह  मान्यवरांची उपस्थिती होती.

Leave a Comment

और पढ़ें

चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन.