सोलापूर आणि लातूर जिल्ह्यासाठी प्रकल्प अधिकारी म्हणून सौ .रेखा सोनकवडे यांची निवड . नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण. रेखा सोनकवडे यांची ग्रामीण विकास मिशनच्या सोलापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती. व्हीएस पँथर्सच्या ७ व्या सामूहिक विवाह सोहळ्याची लातुरात जय्यत तयारी : विनोद खटके चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन. जिल्हा परिषद खैराट या शाळेत महाराष्ट्र दिन व शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न…..

हर खबर सबसे पहले

अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – वाहनासह ८.३९ लाखांचा मुद्देमाल

लातूर / प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशांवर, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात लातूर जिल्हा पोलीस दल सतत सक्रिय असून, याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करून अवैध गुटखा वाहतूक प्रकरण उघडकीस आणले आहे.
दि. २३ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक अवैध धंद्यांविरोधात गुप्त माहिती संकलन व कारवाईसाठी लातूर जिल्ह्यात पेट्रोलिंग करीत होते. सकाळी सुमारे ९:०० वा. पथकाला माहिती मिळाली की, रेनापुर फाटा ते रेणापूर गावाकडे जाणाऱ्या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH 44 G 2994) मधून प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जाणार आहे.
प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. काही वेळातच नमूद वाहन घटनास्थळी येताच पोलिसांनी तत्परतेने कार थांबवून तपासणी केली. सदर कारमधून चालकास ताब्यात घेऊन त्याची ओळख आमर श्रीमंत लकडे (वय २८ वर्षे, रा. बोरवटी, ता. जि. लातूर) अशी पटली.
यानंतर कारची सखोल झडती घेतली असता, वाहनामध्ये विविध प्रकारचे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले. यामध्ये विमल पान मसाला, वी-१ तंबाखू, रजनीगंधा पान मसाला व रत्ना ३००० सुगंधीत तंबाखू असा एकूण अंदाजे २,३९,५८४/- रुपये किंमतीचा गुटखा साठा मिळून आला. तसेच या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिजायर कार (अंदाजे किंमत ६,००,०००/- रुपये) जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ८,३९,५८४/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणी आरोपी अमर श्रीमंत लकडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत कलम ५९ प्रमाणे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास रेनापुर पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस हवालदार अर्जुन राजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, मुन्ना मदने, आनंद हल्लाळे व प्रविण कोळसुरे यांनी पार पाडली.

Leave a Comment

और पढ़ें

चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन.