शिवाई प्रतिष्ठानचा मानाचा पर्यावरण पुरस्कार वृक्ष प्रतिष्ठानच्या डॉ. संध्या वारद यांना देण्यात आला. पृथ्वीवरील प्रदूषण रोखण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. याप्रसंगी शिवाई प्रतिष्ठान अध्यक्ष उषा भोसले, डॉ. जयश्री धुमाळ, डॉ. माधुरी कदम, डॉ. स्नेहल देशमुख, सुनंदा जगताप ,डाॅ संगीता भोसले ,संगीता देशमुख, सई गोरे डाॅ शुभांगी राऊत उपस्थित होत्या. अंजनी हॉटेल येथे दि. 22 मार्च 2026 रोजी या पुरस्काराचे वितरण झाले.







