सोलापूर आणि लातूर जिल्ह्यासाठी प्रकल्प अधिकारी म्हणून सौ .रेखा सोनकवडे यांची निवड . नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण. रेखा सोनकवडे यांची ग्रामीण विकास मिशनच्या सोलापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती. व्हीएस पँथर्सच्या ७ व्या सामूहिक विवाह सोहळ्याची लातुरात जय्यत तयारी : विनोद खटके चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन. जिल्हा परिषद खैराट या शाळेत महाराष्ट्र दिन व शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न…..

हर खबर सबसे पहले

“बापाच्या अश्रूंना न्याय ; २४ तासांत बदलीचा आदेश !” परिवहन मंत्र्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय ; मानवतेचा जिवंत प्रत्यय.

कोल्हापूर, दि. १८ एप्रिल :
कधी कधी शासनव्यवस्थेतही संवेदनशीलतेचा स्पर्श झाला की, एका सामान्य माणसाच्या आयुष्यात आशेचा दिवा प्रज्वलित होतो — याचाच प्रत्यय कोल्हापूर – सांगली मार्गावर पाहायला मिळाला. एका थकलेल्या, अधू पायाने चालणाऱ्या बापाने आपल्या मुलाच्या बदलीसाठी थेट परिवहन मंत्र्यांचा ताफाच अडवला… आणि पुढे जे घडले, ते प्रशासनातील मानवतेचा हृदयस्पर्शी अध्याय ठरला.                 रुकडी फाट्यावर काही ग्रामस्थांसह उभ्या असलेल्या नायकू गवाणे यांनी आपला मुलगा — एसटी चालक अमोल गवाणे — याच्या बदलीसाठी कळकळीची विनंती केली. आपल्या उतारवयात आधार असलेला मुलगा जवळ असावा, ही साधी पण अत्यंत भावनिक मागणी त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर मांडली.                                     ग्रामस्थांनी हात दाखवताच मंत्र्यांनी ताफा थांबवण्याचे आदेश दिले. भर उन्हात स्वतः गाडीतून उतरून त्यांनी त्या वृद्ध बापाची व्यथा ऐकून घेतली. त्या क्षणी सत्ता नव्हे, तर संवेदनशीलता बोलत होती. परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तात्काळ एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना फोन करून—“ताबडतोब बदलीचे आदेश काढा”—असा स्पष्ट निर्देश दिला.                                   आश्चर्य म्हणजे, दुपारी दिलेल्या या आदेशाची पूर्तता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झाली, आणि संबंधित विभागाला बदली आदेश प्राप्तही झाला.             दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांनीही एका पत्राद्वारे व फोन करून या प्रकरणी परिवहन मंत्र्यांकडे अमोल गवाणे यांच्या कौटुंबिक अडचणी लक्षात घेऊन सिंधुदुर्ग विभागातून कोल्हापूर विभागात बदली करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार, श्री. अमोल नायकू गवाणे यांची बदली त्यांच्या विनंतीनुसार कोल्हापूर विभागात करण्यात आली आहे.                                                         या संपूर्ण घटनेमुळे एका वडिलांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू तरळले, तर प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला.                         “मानवतेला दिलेला मानच खरा सन्मान असतो,” याची जाणीव करून देणारी ही घटना ठरली आहे.               या घटणेबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कौतुक होत असून गरिबांचा कैवारी, आणि कर्मचाऱ्यांचा जिव्हाळा…… अशी उपाधी त्यांना देण्यात आल्याचे यावेळी बोलण्यात आले…             या घटनेची सविस्तर माहिती जनसंपर्क अधिकारी यांनी दिली….

Leave a Comment

और पढ़ें

चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन.