सोलापूर आणि लातूर जिल्ह्यासाठी प्रकल्प अधिकारी म्हणून सौ .रेखा सोनकवडे यांची निवड . नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण. रेखा सोनकवडे यांची ग्रामीण विकास मिशनच्या सोलापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती. व्हीएस पँथर्सच्या ७ व्या सामूहिक विवाह सोहळ्याची लातुरात जय्यत तयारी : विनोद खटके चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन. जिल्हा परिषद खैराट या शाळेत महाराष्ट्र दिन व शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न…..

हर खबर सबसे पहले

” महाराष्ट्राची लाडकी जोडी ” रितेश आणि जेनेलिया देशमुख, एस.टी. महामंडळाचे ब्रँड अँबेसीडर.

महाराष्ट्राची लाडकी जोडी ” रितेश आणि जेनेलिया देशमुख, एस.टी. महामंडळाचे ब्रँड अँबेसीडर.        

रितेश देशमुख यांनी जुनी आठवण करून देत एसटी. ने वडिलांनी ( विलासराव देशमुख ) प्रवास केल्याचा किस्सा सांगितला………

माझ्या वडिलांनी म्हणजेच ( विलासराव देशमुख )  साहेबांनी अनेकदा लातूरहून पुण्याला बसने प्रवास केलाय, आम्ही पण लहानपणी एसटीने गेलोय गावाकडं. आजपण आमच्याकडे तो फोटो आहे, ज्यात साहेब ST मध्ये बसलेत, आणि बाहेरून फोटो घेतलाय, रितेशने आज एसटीच्या जुन्या आठवणीत नेलं. मामाचं गाव, आत्याचं गाव, ती पळणारी झाडं, कधीतरी ड्रायव्हरच्या सीटजवळ बसायला मिळाल्याचा आनंद, सीटमधून काढलेला तो बोळा, खटकट वाजणारं तिकीट, जागा पकडायची धडपड, रुमाल टाकायची घाई हे सगळं जिवंत झालं. कारण, आज रितेश देशमुख आणि जिनिलिया ST महामंडळाचे ब्रँड अँबेसीडर झालेत, आपल्या विलासराव देशमुख साहेबांचा लेक आणि सून ‘आपल्या लाल परीचे’ ब्रँड बनलेत. अर्थात, मराठी माणसाला याचा आनंद झालाय. पण आता रितेशची जबाबदारी पण तेवढीच वाढलीय…….   साहेबांचा लेक म्हणून रितेशला नेहमीच मराठी प्रेक्षकांकडून सॉफ्ट कॉर्नर मिळालाय. तर, देशमुख कुटुंबीयांच्या पुढच्या पिढीला तेवढं प्रेम देखील मिळालंय. आज ST महामंडळाचा ब्रँड अँबेसीडर झालेल्या रितेशने आता लाल परीला ब्रँड बनवायला हवं. महामंडळाच्या जुन्या, भंगार गाड्यांची एकदा सफर करायला हवी, एकदा मोडकळीस आलेल्या खिडक्या, उखडलेली सीट, आदळ-आपट करणारा पत्रा, घामेघूम होणारे प्रवासी, खड्यात अदळून बसणारे झटके आणि बस स्टॅण्डवरील स्वच्छता यावर लक्ष द्यायला हवं, ते पाहून सरकारला, मुख्यमंत्री महोदयांना, परिवहन मंत्र्यांना वास्तव दाखवायला हवं. मी अशा ST चा ब्रँड आहे का? हे बदलायचं असं रितेशने म्हणायला हवं. कारण, आजपण रितेश आम्हाला बाभुळगावचा वाटतो, लातूरचा वाटतो, आपला वाटतो. पण, केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी, चित्रपट प्रमोशनवेळी आणि निवडणुकांवेळी तो आम्हाला आपला वाटू नये, तो परमनंट आपला वाटला पाहिजे. म्हणूनच, रितेशने आता स्वतःचा ब्रँड दाखवत, देशमुख ब्रँडला शोभेल अशी ST प्रवाशांना, महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला मिळावी, तितक्या सोयी आणि आधुनिकतेने सज्ज लाल परी असावी यासाठी प्रयत्न करावेत.              आज तुम्ही लातूरला ST ने जाणार का? या पत्रकाराच्या प्रश्नावर रितेशने दिलेलं उत्तर, तुम्ही येणार का? असं होतं. हो, महाराष्ट्राची जनता रोजच येतेय त्या ST ने, त्यामुळेच त्या ST ला बेस्ट बनवण्याची जबाबदारी आता या नव्या ब्रँडची आहे, प्रवाशांचा प्रतिनिधी म्हणून रितेश देशमुखची देखील आहे असं आम्हाला हक्कानं वाटतंय…….                                                   आता एसटी चा कायापालट होणार तो मराठी माणसाच्या आणि त्यातल्या त्यात लातूरच्या ब्रँड अँबेसीडर कडूनच, कारण साहेबांनी केलाय प्रवास एसटीनेच………

Leave a Comment

और पढ़ें

चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन.