अक्कलकोट : प्रतिनिधी : दिनांक 1 मे रोजी जि .प. प्राथमिक मराठी शाळा खैराट या शाळेत महाराष्ट्र दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष कविता जमादार होत्या, ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्योती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणण्यात आले. रेखा सोनकवडे यांनी साक्षरतेची शपथ विद्यार्थी व उपस्थितांना दिली. केंद्रप्रमुख श्रीहरी करपे यांनी उपस्थिताचे स्वागत करून प्रास्ताविक मांडले. यावेळी प्रस्ताविकात शाळेतील विविध उपक्रमाची व विविध शासकिय योजनांची माहिती देण्यात आली. बाळूसिंग राजपुत यांनी अनेक वीरांच्या बलिदानामुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली असल्याचे सांगितले. 1 मे 1811 पासून ” कामगार दिन ” साजरा केला जाऊ लागला. महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या कामगार दिनाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा संदर्भ आहे. या लढ्यात कामगारांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्वाची होती. याच कारणामुळे महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट्र दिना बरोबर कामगार दिन साजरा करण्यात येऊ लागला. यावेळी सर्व कामगारांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आले. रेखा सोनकवडे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सोबतच माहितीही दिली. याप्रसंगी शशिकला तोळनुरे, ज्योती जमादार, पुष्पा पोतदार, उषा पांचाळ, आरोग्यसेविका आंबीका वळसंग, राकेश चव्हाण, हे व अनेक पालक, गावकरी, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित होते. यानंतर आंबीका वळसंग व उषा पांचाळ यांनी आरोग्यविषयक माहिती सांगितली. फिरोजा नदाफ यांनी सर्व विद्यार्थ्याना 1 मे पासून लागत असलेल्या व 15 जून पासून शाळा सुरु होत असलेल्या सुट्टीबाबत सूचना दिल्या. सुनील होनाजे यांनी सर्वांचे आभार मानले व त्यांनीही महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.









