
सोलापूर : प्रतिनिधी : ग्रामीण विकास मिशन भारत ( महाराष्ट्र राज्य ) जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून सौ. रेखा लक्ष्मण सोनकवडे यांची नियुक्ती करण्यात आली. अपना साथ अपना विकास ग्रामीण विकास मिशन प्रत्येक गावातील ग्रामविकास क्रुषिविकास औद्योगिक विकास करण्यासाठी काम करते. गावाचा सर्वांगीण विकास होणेसाठी ग्रामीण विकास मिशन शिक्षण स्वच्छता पाणी व्यवस्थापन रोजगार निर्मिती अश्या विविध क्षेत्रामधे सकारात्मक बदल करते. व्यवसाय प्रशिक्षण, रोजगार निर्मिती, महिला बचत गट खाद्यपदार्थ निर्मिती, महिला सिक्यूरिटी प्रशिक्षण, तंत्रक्षेत्रात प्रशिक्षण, वाहन चालक प्रशिक्षण, पीक कार्यशाळा, इरिगेशन जल व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक, कंपनी प्रक्रिया, उद्योग कम्पनी शेडनेट व पोलीहाऊस शेती ए आय तंत्रवापर पीक कार्यशाळा. कुकुटपालन व शेळीपालन दुग्धव्यवसाय, सेंद्रिय शेती हवामान बदलानुसार पीक लागवड, आरोग्यविषयक जनजागृती, आरोग्य तपासणी शिबिरे, डोळ्याचे मोफत उपचार, योग प्रशिक्षण, रक्तदान शिबिरे, बालकांची आरोग्य तपासणी, हास्यक्लब सेंटर, शालेय वस्तूचे वाटप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य विकास अभ्यासक्रम, स्कॉलरशिप, पोषणआहार केंद्र, पाणंद रस्ते, जलसंधारण, पाणी आडवा, पाणी जिरवा, झाडे लावा. सौर ऊर्जा निर्मिती, संगणक साक्षरता, स्वच्छता अभियान, योग कार्य शाळा, विरंगुळा केंद्र, वाचनालय, आध्यात्मिक सहल, व्रुध्हाश्रम व्यवस्था, अश्या सुविधा ” ग्रामीण विकास मिशन भारत करते ” आपले गाव सर्व सुख सुविधानी युक्त असावे असे प्रत्येक गावातील व्यक्तीला वाटले पाहिजे गावाचा सर्वांगीण विकास घडवुन आणायचा असेल तर प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामीण विकास मिशन भारत ( महाराष्ट्र राज्य ) जोडली जावी, यासाठी सोलापूर जिल्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावच्या ग्रामसेवक आणि सरपंच यांनी ग्रामीण विकास मिशन मधे सहभागी होण्याबाबत पत्र दिल्यास ही संस्था आपल्या गावाला पत्र देऊन सहभागी करून घेते आणि गावच्या विकासावर भर दिला जातो. अपना साथ अपना विकास गावचा विकास करण्यासाठी ग्रामीण विकास मिशनमधे सहभागी होण्याबाबत सोलापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी रेखा सोनकवडे यांनी आवाहन केले, तसेच मोबाईल क्रमांक : 9405239310 या नंबरला ग्रामसेवक सरपंच सम्पर्क करू शकतात.







