लातूर : दि. 23 मार्च. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस लातूर विभागाच्या वतीने लातूर विभागाचे नूतन विभाग नियंत्रक श्री. विलास राठोड यांचे संघटनेचे सरचटणीस मा. श्रीरंग बरगे व लातूर विभागातील संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले, व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले. यावेळी मा. श्रीरंग बरगे यांनी विभाग नियंत्रक श्री. विलास राठोड यांना लातूर विभागातील एसटीला मोठा फटका देणारी अवैध वाहतूक परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतरही सुरु असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच लातूर, उदगीर, अहमदपूर, औसा, येथून मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि संभाजीनगर या प्रमुख शहराकडे मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहतूक सुरु असल्याने एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असून लातूर जिल्ह्यात सुमारे 20% वाहतूक अवैध प्रकारमुळे प्रभावित झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांची बाजुही एकूण घेण्याची विनंती श्री. बरगे यांनी विभाग नियंत्रकांना केली असता सर्व कर्मचाऱ्यांनी लातूर विभागातील संपूर्ण आगारातील विश्राम ग्रह स्वच्छता, महिलांचे विश्राम ग्रह, शौचालय ग्रह पडझड झाली असून, वारंवार तक्रार देऊनही आगार व्यवस्थापक यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सर्व आगारातून कर्मचारी श्री. श्रीरंग बरगे यांच्या भेटीसाठी व विभाग नियंत्रक यांच्या स्वागतासाठी उपस्थित होती. तसेच सर्व आगारातील कर्मचाऱ्यांची आलोकेशन विभाग प्रमुख, यांच्याकडून नियंतामध्ये दुजाभाव दिसून येत असल्याने कर्मचारी नाराजी, गाड्या रद्द होण्याचे प्रकार, किलो मिटर कमी जास्ती याबाबत नाराजी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. लातूर विभागाचे विभाग नियंत्रक श्री. विलास राठोड यांनी सर्व कर्मचाऱ्यांची बाजू एकूण घेऊन यापुढे कोणावरही अन्याय होणार नाही, व राज्य परिवहन महामंडळाच्या शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार आणि परिपत्रकानुसार निर्णय घेण्यात येतील. पुढील आठवड्यात सगळ्यांच आगारात जाऊन स्वच्छता ग्रह, विश्राम ग्रह, शौचालय, हे व्यवस्थित व टापटीप असतील अशी हमी देऊन कर्मचाऱ्यांची नाराजी दूर केली… यावेळी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांच्यासोबत लातूर विभागीय सचिव महेश बिराजदार, विभागीय कार्याध्यक्ष विष्णू चौधरी, विभागीय कोषाध्यक्ष शिवनारायण केंद्रे, विभागीय प्रसिद्धीप्रमुख अनिल कोकणे, तसेच विवेक बेळकुंदे , हनुमंत वरवटे , उमाकांत दोडके, मुळे, घुगे, कछवे , हणमंत पाटील, महिला प्रतिनिधी अर्चना जाधव, अश्विनी उखळे, गुट्टे मॅडम, देवशेटवार मॅडम, व लातूर विभागातील प्रत्येक आगारातील कर्मचारी उपस्थित होते…







