लातूर : दि. 14 एप्रिल रोजी लातूर आगारात एस टी कर्मचारी उत्सव समिती यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठया उत्साहात व थाटामाटात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रवक्ते, अभ्यासक, निलेश खटाव हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून लातूर विभागाचे विभाग नियंत्रक विलास राठोड, संदीप पडोळकर, अमित गंधारे, प्रवीण राठोड, आगार व्यवस्थापक बाळासाहेब राठोड हे आगारात उपस्थित होते, आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश रामपुरे, हे होते. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या वेळी संतोष बिराजदार, बाळासाहेब राठोड, कार्यक्रम समितीचे सचिव परमेश्वर सताळकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विभाग नियंत्रक, विलास राठोड, महेश रामपुरे, संतोष बिराजदार, बाळासाहेब राठोड यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून, डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुणे व आलेल्या अधिकाऱ्यांचा बाबासाहेबांच्या ” बुद्ध आणि यांचा धम्म ” हे पुस्तक देऊन सत्कार, स्वागत करण्यात आले…, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आगार व्यवस्थापक बाळासाहेब राठोड यांनी केले, यावेळी त्यांनी आगारात घेण्यात आलेल्या जयंती कार्यक्रमाच्या समितीचे अभिनंदन केले. आणि येणाऱ्या 26 एप्रिल रोजी आगारात आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याचे कर्मचाऱ्यांच्या आणि विभाग नियंत्रक यांच्या निदर्शनास आणून दिले. लातूर आगारात जयंती समिती मार्फत घेण्यात आलेला कार्यक्रम बघून मी भारावून गेलो आहे, आणि यापुढे असे कार्यक्रम आगारात व्हावेत सोबतच रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, असे अनेक कार्यक्रम राबवावेत असा सल्ला लातूर विभागाचे विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी केले…. अभिषेक पाटील यांनी खूप मोलाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना अधिकार आणि संविधान दिल्याची जाणीव करून दिली. यावेळी 135 व्या जयंती उत्सव 2026 चे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष बाळासाहेब राठोड, उपाध्यक्ष भास्कर डोंबाळे, सचिव परमेश्वर सताळकर, सहसचिव विभीषण गाथाडे, कोषाध्यक्ष विकास काले, सहकोषाध्यक्ष समाधान बचाटे, आणि समितीचे कार्याध्यक्ष नीता कांबळे, संतोष बडे, सतीश घोडके, प्रेमकुमार सावळकर, बालाजी मोरे, माधव साखरे. व लातूर आगाराचे सर्व कर्मचारी यावेळी आवर्जून उपस्थित होते.









