लातूर, दि. ०४ : लातूर जिल्ह्याच्या प्रशासनाला नवे नेतृत्व मिळाले असून नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज (दि. ०४) अधिकृतपणे पदभार स्वीकारला. मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्याकडून त्यांनी कार्यभार हाती घेतला. पदभार स्वीकारताना वर्षा ठाकूर – घुगे यांनी डॉ. बास्टेवाड यांचे स्वागत करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशासनातील विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे तसेच तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









