सोलापूर आणि लातूर जिल्ह्यासाठी प्रकल्प अधिकारी म्हणून सौ .रेखा सोनकवडे यांची निवड . नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण. रेखा सोनकवडे यांची ग्रामीण विकास मिशनच्या सोलापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती. व्हीएस पँथर्सच्या ७ व्या सामूहिक विवाह सोहळ्याची लातुरात जय्यत तयारी : विनोद खटके चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन. जिल्हा परिषद खैराट या शाळेत महाराष्ट्र दिन व शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न…..

हर खबर सबसे पहले

भारतीय दलित पँथरच्या समतेच्या संस्काराचा पंधरवडा जिल्हा लातूर अंतर्गत समतारत्न प्रा.एन.जी.स्वामी यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध धम्म संस्काराने अभिवादन

लातूर, दि.7 : भारतीय दलित पँथरच्या समतेच्या संस्काराचा पंधरवडा जिल्हा लातूर अंतर्गत स्मृतीशेष  समतारत्न  प्रा. एन. जी. स्वामी यांच्या 71 व्या जयंतीनिमित्त भारतीय दलित पँथरकडून बहुजन हिताय मुलांचे वस्तीगृह विक्रम नगर, लातूर  येथे  धम्मचारी कल्याणदस्यी यांच्या हस्ते प्रा.एन.जी.स्वामी यांच्या प्रतिमेची बौद्ध धम्म संस्काराने पूजन करून, समतेच्या संसाराच्या पंधरवड्याची सुरुवात करण्यात आली.
प्रा.एन.जी.स्वामी यांचे विद्यार्थी रणजित आचार्य यांच्या अध्यतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विकास वाघमारे,विक्रम नगर,जयंतीउत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनाथ माने,प्रा.डॉ.राहूल डोंबे,मार्गदर्शक ज्येष्ठ पँथर प्रा.शिवशरण हावळे तर विशेष  विशेष उपस्थिती म्हणून उज्वल भारत न्युज चे संपादक  विलास घारगावकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.हावळे म्हणाले की, प्रा.एन.जी.स्वामी हे महात्मा बसेश्‍वर महाविद्यालय समाजकार्य विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांचा पिंडच मुळात समाजकार्याचा होता. त्यांच्यावर महात्मा बसवेश्‍वरांच्या समतावादी तसेच शिव शाहू फुले आंबेडकर यांच्याही विचारांचा प्रभाव त्यांच्यावरती होता. ते जरी का लिंगायत जंगम स्वामी समाजाचे असले तरीपण समाजातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे. समाजात स्वाभिमानाने ताठ मानेने जगले पाहिजे,असा त्यांचा अट्टाहास होता. त्यासाठी ते विशेष काळजी घेत असत. त्यांच्या सोबतीला समाजकार्य भागातील प्रा.डॉ.संजय गवई, प्रा.डॉ.मौने ,प्रा.के.यू.पवार, प्रा.डॉ.शेटकार, प्रा.गिरजाप्पा मुचाटे हे सुद्धा होते. उपजतच प्रा.एन.जी. स्वामी यांना कामाची आवड असल्यामुळे ते एनएसएस मध्ये सुद्धा सक्रिय होते. एन एस एस मध्ये काम करताना प्रा.डॉ.पळसकर, प्रा.डॉ.एम.एस. दडगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असत.कामाचा व्याप असताना सुद्धा ते म.बसवेश्‍वर महाविद्यालयांमध्ये जे मागासवर्गीय व सर्वच जाती-धर्मातील गरजूगरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी खूप नगण्य वार्षिक फीस घेऊन ते वसतिगृह चालवायचे.या वसतिगृहाचे ते रेक्टर होते. याकामी त्यांच्या सोबतीला देशमाने,जाधव हे कर्मचारी होते. त्यावेळीचे प्राचार्य डॉ. सीतानगरे , प्राचार्य डॉ. रोडे, प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार यांचे ते खूप विश्‍वासू व आवडते प्राध्यापक होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. राहुल डोंबे म्हणाले की, ज्या प्राध्यापकांनी आयुष्यभर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाच्या माध्यमातून अलौकिक कार्य केले त्यांची प्रथम जयंती त्यांच्याच विद्यार्थ्यांनी बहुजन हिताय सारख्या वसतिगृहात साजरी करावी हे खूप आदर्शवत आहे.मुळात तथागत गौतम बुद्धांचा उपदेश आणि कार्य बहुजन हिताय बहुजन सुखाय! असेच आहे. त्याचेच अनुकरण प्रा. एन.जी.स्वामी यांनी त्यांच्या हयातीत केले असे मला वाटते.
 विलास घारगावकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा अशाप्रकारे आचरणशील कार्यक्रम करून समाजात समतेचे विचार पेरण्याची आज खरी गरज आहे. भारतीय दलित पँथर लातूरच्या जिल्हाध्यक्षांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जो हा समतेच्या संस्काराचा पंधरवाडा साजरा करण्यासाठी प्रा.एन.जी स्वामी यांच्या प्रतिमेचे धम्म संस्काराने पूजन केले हे प्रा.एन.जि.स्वामी यांनी त्यांच्या जातीच्या बाहेर जाऊन समतेवर आधारित जे लोककल्याणाचे कृतिशील काम केले त्या कामाची ही आज त्यांच्या विद्यार्थ्यांनी विचारांच्या वारसदारांनी दिलेली खरी कृतिशील पावती आहे.
 अध्यक्षीय समारोपात रणजीत आचार्य करताना ते म्हणाले की प्रा.नागनाथ स्वामी यांनी मी ज्यावेळी प्रथम महाविद्यालयामध्ये प्रवेश केला त्यावेळेस माझे डोक्यावरील केस हात हात वाढलेले होते, सरांनी माझ्या मामाला बोलावून घेऊन स्वतःमला केश कर्तनालयात नेवून माझी  कटिंग करविली. माझ्यासारख्या खेड्यातून आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आयुष्य सर्वांगाने संपन्न आणि संस्कारीत, विकसित करण्याचे काम स्वामी सरांनी केले.
       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भारतीय दलित पँथर लातूरचे जिल्हाध्यक्ष सुनील मांदळे यांनी म्हणाले की, महात्मा बसवेश्‍वर महाविद्यालयामध्ये जे मागासवर्गीय आणि समाजातील सर्वच जाती धर्मातील गरीब,गरजू,होत करू  विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवले जात होते.ते बंद पाडण्याचे पाप महाविद्यालयातील काही विषमतावादी लोकांनी केले. समाजात जाती-धर्माच्या नावावरती समते वरती,लोकशाही मूल्यावर आधारित असलेला हा समाज या विषमतावादी,लोकांना विघटित करायचा आहे.त्यांच्या विषमतावादी विचारांना थोपवण्यासाठी म्हणून भारतीय दलित पँथरच्या माध्यमातून आम्ही समतेच्या संस्काराचा पंधरवडा हा उपक्रम राबवत आहोत. या कार्यक्रमासाठी भीमगायक, जलसाकार धम्मपाल सावंत, धम्ममित्र जालिंदर कांबळे, प्रा. प्रवीण कांबळे, धम्म मित्र कांबळे काका व बहुजन हिताय वसतिगृहातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
                             

Leave a Comment

और पढ़ें

चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन.