सोलापूर आणि लातूर जिल्ह्यासाठी प्रकल्प अधिकारी म्हणून सौ .रेखा सोनकवडे यांची निवड . नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण. रेखा सोनकवडे यांची ग्रामीण विकास मिशनच्या सोलापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती. व्हीएस पँथर्सच्या ७ व्या सामूहिक विवाह सोहळ्याची लातुरात जय्यत तयारी : विनोद खटके चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन. जिल्हा परिषद खैराट या शाळेत महाराष्ट्र दिन व शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न…..

हर खबर सबसे पहले

मनपाकडून क्षयरोग रुग्णांना न्यूट्रिशनल सपोर्ट किटचे वाटप, महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी योगदान दिले.

लातूर /प्रतिनिधी: जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आज दि ०७/०४/२०२६ रोजी महापौर जयश्रीताई सोनकांबळे मॅडम,आयुक्त मानसी मॅडमसभागृह नेते विजयकुमार साबदेस्थायी समिती सभापती,सचिन बंडापल्ले,विरोधीपक्ष नेते देविदास काळे,नगरसेवक फारुक शेख,उपायुक्त फड,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.शंकर भारतीवैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षवर्धन राऊत (जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय) यांच्या उपस्थितीत १०० क्षयरुग्णांना फूड बास्केट देण्यात आले.                                                                                                             लातूर जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी शासनाकडून औषधींचा मोफत पुरवठा करण्यात येतो.औषधे मिळत असली तरी रुग्ण पूर्णपणे बरा होण्यासाठी पोषण आहार आवश्यक असतो. या उपक्रमात लोकसहभागातून न्यूट्रिशनल सपोर्ट किट देता येते. या माध्यमातून निक्षय मित्र होता येते अशी माहिती  डॉ.हर्षवर्धन राऊत यांनी दिली.                                                         महापौर व आयुक्त यांनी लातूर शहरातील क्षयरोग रुग्णांना फ़ूड बास्केट वितरणासाठी विविध सेवाभावी संस्थांना आवाहन करण्यात आले.आजच्या दिवशी फ़ूड बास्केट चे दाते म्हणून लातूर शहर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी योगदान दिले.                                 तसेच आगामी काळात उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी सदर मोहिमेचे कौतुक करत त्यांनी देखील या मोहिमेत सहभागी होण्याची सहमती तसेच अधिकाधिक स्वयंसेवी संस्थांना प्रेरित करण्याचे आश्वासन दिले.     

 

 

 

 

Leave a Comment

और पढ़ें

चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा ! कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण अन शिक्षकांचा ‘संविधान’ देऊन सन्मान, शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन ; डॉ.हुलगेश चलवादींचे प्रतिपादन.